शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांची टोल नाका येथे धडक

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांची टोल नाका येथे धडकले.विविध मागण्यासाठी नॅशनल हायवे क्रमांक ५३ टोल नाका तरोडा कसबा तसेच नॅशनल हायवे ५३ मेंटनस करिता असलेले कामगार कर्मचारी लोकल वाहन चालक यांना होत असलेल्या त्रासाबद्दल संबंधित अधिकारी मॅनेजर यांची भेट घेऊन मागण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या.त्यामध्ये प्रामुख्याने हायवेच्या मेंटेनेस मध्ये हायवे वरती मोठ्या प्रमाणात कामगार मजुरी करत असताना हजारो वाहने वाहतूक करताना त्यांना कामे करावी लागतात त्यांना सर्व सुविधा देणे बंधनकारक आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची सेफ्टी देण्यात आलेली नसून त्यांना सेफ्टी किट नाही,त्यांचा इन्शुरन्स, नाही,त्यांना पीएफ नाही, त्यांना आठवड्यातून च्या सुट्ट्या नाहीत 12 तास ड्युटी परंतु पगार अत्यंत कमी,पेमेंट स्लिप नाही,व काही सुविधा मागण्यास गेल्यास त्यांना कमावून कमी करण्याची धमकी देण्यात येते,अशा विविध प्रकारच्या अडचणी घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे आपल्या कार्यकर्त्यांसह थेट टोलनाक्या वरती धडकले व अधिकाऱ्यांना धारेवर धरले व काही अधिकारी बाहेर राज्यांमध्ये राहणारे असल्यामुळे त्यांच्यासोबत फोन कॉल द्वारे चर्चा केली. 

यातील काही मागण्या मान्य सुद्धा केल्या परंतु उर्वरित सर्व मागण्याच्या ०७ दिवसाचा टाइम देण्यात आला.परंतु ०७ दिवसांमध्ये मागण्या पूर्ण नाही केल्यास पुन्हा ऑफिस वरती जाऊन त्यांना शिवसेना स्टाईलने जाब विचारण्यात येईल,या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा टोल कर्मचारी यांना अडचणी निर्माण झाल्या तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती, तेवढेच नाही तर पगारवाढ तसेच पीएफ देखील सुद्धा मंजूर करून दिला होता,परंतु काही मागण्या अद्याप पर्यंत बाकी आहेत.

तसेच मेंटेनेस मध्ये असलेले सर्व कामगार यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्या सुद्धा सात दिवसात सोडविण्याचे मेंटेनेस अधिकारी यांनी आश्वासन दिले.परंतु ०७ दिवसाच्या आत अडचणीं नाही सोडल्यास शिवसेना स्टाईल ने त्यांना उत्तर देण्यात येईल असे ठणकावून सांगितले.यावेळी उपस्थित शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,शिवसेना विभाग प्रमुख चेतन शलकर,अजय महाले,दत्ता गायकवाड संदीप इंगळे सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख नरेंद्र गावंडे,गोपाल अवथडे, यांच्यासह टोल कर्मचारी ऋषभ वाळवे ,रोशन टिकार डॉक्टर नंदकिशोर खंडारे,डॉक्टर मोहम्मद अजाज खान,अभिषेक टिकार,धनंजय महाले,अमोल महाले,गोपाल ताठे,गणेश ताठे,ऋतिक ताठे,महादेव गोळे,सागर पांडे,बाबुराव तेलगोटे,गणेश पांडे,रघुनंदन तायडे,गजानन मोरे,आदित्य टिकार,विशाल कवळकार,शैलेश महाले,समाधान महाले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post