लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचा 'रंग दे तिरंगा' आंतरशालेय नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न!
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उत्साह द्विगुणीत करत, लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने 'रंग दे तिरंगा' या देशभक्तीपर आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री. कोlकर स्मारक खामगाव येथे २६ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी देशाप्रती असलेली भक्ती आणि सन्मान व्यक्त केला. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत, लायन्स क्लबने विद्यार्थ्यांना त्यांची सुप्त प्रतिभा जगासमोर आणण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गणेशाच्या वंदनाने झाली, ज्यातून एक सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख ला. गोविंद चुडीवाले, ला. अजय एम. अग्रवाल, ला. उज्ज्वल गोयंका, ला. संजय उमरकर, ला. अभय अग्रवाल , ला. राजकुमार गोयनका, ला. वीरेंद्र शाह, आणि अनुज चुडीवाले यांनी या भव्य आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पद्यामागे ॲड अमित शर्मा , ॲड सूरज शर्मा, गौरव चूड़ीवाले, उमेश अग्रवाल, युवराज जैन, कृष्णा पंजवानी यांनी काम पाहिले.
देशभक्तीपर गीतांच्या तालावर, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रत्येक नृत्यातून देशाप्रती असलेले प्रेम आणि त्याग दिसून येत होता. 'संस्कार ज्ञानपीठ' शाळेने सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरी करत फिरती ढाल पटकावली.
गटानुसार विजेते:
गट अ: थिम : पर्यावरण स्वच्छता आणी सफाई - सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल २. माय फर्स्ट स्टेप ३. किडझी उत्तेजनार्थ: बचपन प्ले स्कूल
गट ब: थिम : भारतीय सांस्कृतिक वारसा
१. संस्कार ज्ञानपीठ २. युगधर्म पब्लिक स्कूल ३. आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ: सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल
गट क: हिंदू पौराणिक कथ १. संस्कार ज्ञानपीठ २. कृष्णाई लिटिल फ्लॉवर ३. ए. के. नॅशनल उत्तेजनार्थ: एन. व्ही. चिन्मय विद्यालय
गट ड: सामाजिक संदेश
१. सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल २. कृष्णाई लिटिल फ्लॉवर स्कूल ३. संस्कार ज्ञानपीठ उत्तेजनार्थ: सरलाबाई दिगंबर वरंगावकर विद्यालय
या व्यतिरिक्त रोटरी मतीमंद शाळेतील व श्रीराम एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मूक बधिर विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. या दोनही शाळेतील विद्यार्थ्यांचे नुत्य सुद्धा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना सांत्वना पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाला लॉ गोविंद चुडीवाले, इस्मो टाइल्सचे संचालक श्री. इस्माईल बोहरा व हमजा बोहरा, क्वालिटी पेंटचे संचालक श्री. हुसेन/अली असगर, आणि संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रतीक सुरुशे व डॉ. (सौ.) दिपाली सुरुशे पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे अध्यक्ष पिएमजेएफ ला. आकाश अग्रवाल, सचिव ला. डॉ. निशांत मुखिया, कोषाध्यक्ष ला. सीए आशिष मोदी ला. सूरज एम. अग्रवाल, ला. योगेश शर्मा , ला. सिद्धेश्वर दाणे, ला अजय एस अग्रवाल , ला राजू थाडा , ला रविंद्रसिंग बग्गा, महिला लायन्स मेंबर्स, व सर्व सदस्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. अभय अग्रवाल आणि ला. संजय उमरकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयंका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.


Post a Comment