चॅलेंजिंग प्रकरणाचा पोलिसांनी लावला छळा : पिस्तूल सह दोघांना केली अटक
खामगाव जमादार न्यूज नेटवर्क :- पिस्तोल च्या धाकावर अडीच लाखाच्या वर किंवा रक्कम हिसकण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या दोन चोरांना पोलिसांनी अखेर बिड्या ठोकल्या. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकाराला पोलिसांनी मेहनतीनंतर उघड केल्यामुळे पोलिसांचे हात लंबे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
![]() |
| Advt. |
अत्यंत किचकट व क्लिष्ट स्वरुपाचा हा गुन्हा असतांना तसेच आरोपीतांनी कोणाताही पुरावा सोडलेला नव्हता परंतु तपास पथकाने CCTV फुटेज तसेच तांत्रीक विश्लेषन करुन कसोशीने आरोपी गजानन यशवंत गाडेकर राहणार बाळापुर व योगेश दिगांबर पुरी राहणार शेगांव यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी स्कुटी व पिस्तोल तसेच तीन राऊंड हस्तगत करण्यात आले.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचे आव्हान स्वीकारत पोलीस निरीक्षक आर एन पवार, एपीआय भागवत मुळीक, हेड कॉन्स्टेबल हेलोडे, मोठे, सागर , अंकुश गुरुदेव, राहुल थारकर, गणेश कोल्हे, राम धामोडे, अमरदिपसिंह ठाकुर तसेच सायबर तज्ञ राजु आडवे, कैलास ठोंबरे यांनी चोरट्याना मुद्देमालासह जेरबंद केले.



Post a Comment