शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या आंदोलनाला यश

टोल, हायवे मेंटेनन्स कर्मचारी यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य

खामगाव जनोपचार नेटवर्क :मोंटोकालों कंपनीकडून सब कॉन्टॅक्ट घेतलेल्या पायलोन कंट्रक्शन मेंटेनेस टॉप NH 53 (अमागाई) टोल नाका तरोडा कसबा इथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यामध्ये १२ तास ड्युटी पगार अत्यंत कमी हायवे वरती पेट्रोलिंग करत असताना कुठलीच सेफ्टी किट नव्हती, इन्शुरन्स नव्हता, पीएफ नव्हता, पेमेंट स्लिप नव्हती, महिन्यातून एकही सुट्टी नव्हती, पगार दोन महिने लेट होत होता. अशा सर्व मागण्यांचे निवेदन दिले होते. व त्यामध्ये सात दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे मागणी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या. सात दिवसात मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आठव्या दिवशी काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व कामगारांनी अत्यंत महत्त्वाचे असलेले सर्व सेवा बंद केल्यामुळे कंपनी जागी झाली आणि आत्तापर्यंत केलेल्या अन्यायाची जाणीव झाली तातडीने सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या, लेखी स्वरूपात पत्र दिले.



Post a Comment

Previous Post Next Post