ब्रह्माकुमारीज व पंचवटी फॉर्मचे आरोग्य शिबिर
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी शारीरिक स्वास्थ महत्त्वाचे - बीके शकुंतला दीदी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- रामचरितमानसच्या तप,सेवा, सुमीरन या तीन सूत्रावर आधारित आरोग्य, आहार, अध्यात्म मार्गदर्शक शिबिराचा समारोप 12 सप्टेंबर शुक्रवार रोजी ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, रायगड कॉलनी येथे संपन्न झाला.
समारोपीय कार्यक्रमामध्ये सेवा केंद्राच्या संचालिका शकुंतला दीदी यांनी उपस्थितांना राजयोगाची साधना करताना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी शारीरिक स्वास्थ फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण सर्वांनी शिबिरामध्ये शिकवल्याप्रमाणे आहार व्यायाम ,प्राणायाम व राजयोग ध्यान करावे, आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल करून आपलं शरीर निरोगी बनवण्याचा स्वतः शी दृढ संकल्प करावा, अशी शुभ भावना व्यक्त केली.
पंचवटी फॉर्म शेगावचे संचालक इंजिनियर श्री दिलीप काळे, डॉक्टर जया काळे ,डॉक्टर गीता सरजने यांनी पाच दिवसीय आरोग्य शिबिरामध्ये मोलाचे मार्गदर्शन दिले. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व ईश्वरी साहित्य देऊन आदरणीय शकुंतला दीदीजी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पंचवटी फार्मचे 76 वे हे शिबिर यशस्वीरित्या या ठिकाणी करून अमूल्य असे सामाजिक कार्य केल्याबद्दल सर्वांच्यावतीने विशेष आभार मानले. तर दर्यापूर येथील सहभागी बहिणींनी आयोजकांचा सत्कार व भेट दिली. तर पंचवटीच्या वतीने पुस्तके देऊन दीदींना सन्मानित करण्यात आले. शिबिरात दररोज नैसर्गीक भोजन व्यवस्था सांभाळणाऱ्या बीके दिव्या दीदी, दिलीप काळे सर यांचाही सत्कार करण्यात आला.
या शिबिरामध्ये एकूण 68 शिबिरार्थींनी भाग घेतला.यामध्ये 5 दिवस आगळा वेगळा नैसर्गिक आहार फार प्रभावशाली ठरला. अनेकांच्या लहान सहन व्याध्या निघून गेल्यात, वजन कमी झाले, मांडी घालून खाली बसता येणे, जेवणे शक्य झाल्याचे अनेक अनुभव सर्वांनी अनुभवले यामुळे आनंदी वातावरण होते, तर यशस्वीरित्या हे शिबिर पार पडले.
शेवटी सर्वांना ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने ईश्वरीय साहित्य भेट देण्यात आले. व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दीदी अकोला यांनी केले, तर आभार राजेश राजोरे यांनी मानले.

إرسال تعليق