शेतकऱ्या प्रति नेहमीच आपुलकीची भावना असणारे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी साहेब यांना शिवसेनेने निवेदन देताच काम लावले मार्गी  पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तात्काळ द्या असे शिवसेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताच तात्काळ संबंधित विभागाला सूचना करून नैसर्गिक आपत्ती विभागांमध्ये पडून असलेली खरडून गेलेल्या जमिनीची यादी अपलोड करायची सांगितली शासन स्तरावर आपणास लवकरात लवकर मदत मिळेल ते आपल्या खात्यात जमा होईल अशी ग्राही दिली.तसेच सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचीही मागणी


खामगाव : येलो मोझॅक व चारको रोट रोगामुळे सोयाबीन पिक काढणीपुर्वीच जळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्या संबंधित सुद्धा तात्काळ प्राथमिक पाहणी करण्याचे आदेश सुद्धा आपण देत आहोत तसेच कृषी विद्यापीठाची टीम तपासणी केल्यानंतर त्या संबंधित निर्णय होईल असे सांगण्यात आले.

तसेच शिवसेनेची मागणी मध्ये असलेले मुख्य विषय शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे तसेच ७ व ८ जुलै २०२४ रोजी ढगफुटी सदृष्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात दिनांक.११ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

          निवेदनामध्ये नमुद आहे की, या हंगामात प्रामुख्याने पिंपरी देशमुख शिवारासह खामगाव तालुक्यामध्ये येलो मोझॅक व चारको रोट रोगामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी तहसील व कृषी विभागाला वारंवार सांगून सुद्धा अद्याप पर्यंत साधे पंचनामा किंवा सर्वे करण्यात आलेले नाहीत. प्रशासनाने हलगर्जी पणा न करता तात्काळ पंचनामे करावे तसेच मागील वर्षी ७ व ८ जुलै २०२४ रोजी खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी, कोलरी, आवार, जळका तेली,नागापूर,टेंभुर्णा,आदी गावात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्यामुळे पिकांसह शेत जमीन खरडून गेली होती, परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. शेतकरी वारंवार मदतीसाठी कार्यालयात चकरा मारत असून अत्यंत गंभीर परिस्थिती असताना शासन शेतकऱ्याबाबत गंभीर दिसत नाही. मागील काळात खरडून गेलेल्या जमिनीचे केवायसी करण्याकरिता व्हीके नंबर देण्यात आले, मात्र केवायसी झाल्यावर पिकाची मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना जमीन खरडून गेल्याचा मोबदला मिळणार नाही असे सांगण्यात आले. शासनाने दिरंगाई न करता तात्काळ नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहर प्रमुख चेतन ठोंबरे, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश वावगे,युवा सेना शहर प्रमुख राहुल कळमकार,विकी खराडे, बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश बोरे, उपशहर प्रमुख बाळू पाटील, वैभव परदेशी,किशोर धोटे महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,महिलाआघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,महिला आघाडी उपशहर प्रमुख श्वेता ताई पाटील,उपशहर प्रमुख आनंद सारसर,किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुळकर,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,तब्बू तायडे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,गोविंद पाटील,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर भाऊ मेतकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन भाऊ हूरसाळ,शिवसेना उप तालुकाप्रमुख प्रविन पाटील,शिवसेना उप तालुका प्रमुख मंगेश भाऊ काळे,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देशमुख,शिवसेना अनुसूचित जाती जमाती उपजिल्हाप्रमुख करण भाई बहुनिया,अनुसूचित जाती शहर प्रमुख मयूर भाई खंडारे,विभाग प्रमुख जीवन भाऊ साळुंके,विभाग प्रमुख गोपाल भाऊ शेळके,शाखाप्रमुख गोपाल भाऊ चव्हाण,विभाग प्रमुख आकाश माने,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,विभाग प्रमुख गोविंदा सरोदे,विभाग प्रमुख चेतन भाऊ शेलकर,विभाग प्रमुख मारुती भाऊ जगताप, विभाग प्रमुख प्रदीप बघे,नारायण काका टिकार,विभाग प्रमुख गणेश भाऊ ढगे,सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख सुरेश ढोले,दत्ता वांडे,गोपाल चरखे,विभाग प्रमुख प्रभाकर भाऊ बघे,गजानन भाऊ बघे, पुरुषोत्तम पाटील पेसोडे, पंजाब टाकस,विक्की भाऊ खराडे,अभिषेक खोंड, विभाग प्रमुख रुपेश तायडे,सुनील बोदळे, विशाल फाळके,राजेंद्र अंमलकार, संकेत तायडे,मंगेश चोपडे, गोविंदा साळुंके,रामा साळुंके,कुंदन साळुंके, महादेव लाहुलकार,यांच्यासह शिवसेना,युवा सेना,महिला आघाडी,किसान सेना,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विद्यार्थी सेना,सोशल मीडिया,तसेच शिवसेना, अंगीकृत सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

أحدث أقدم