माेताळ्याचा तहसीलदार हेमंत पाटील याला दाेन लाखांची लाच घेतांना पकडले; अकाेल्याच्या एसीबीची बुलढाण्यात कारवाई
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : शेतजमीनीचा वर्ग बदलण्यासाठी दाेन लाख रुपयांची लाच घेतांना माेताळ्याचा तहसीलदार हेमंत भागवत पाटील याला अकाेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज १४ सप्टेंबर राेजी रंगेहाथ पकडले. बुलढाणा शहरातील लक्ष्मीनगर स्थिती पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पैसे घेतल्यानंतर शंका आल्याने पाटील यांनी स्विकारलेले पैसे शाैचालयात फेकले हाेते. मात्र, पथकाला ती रक्कम जप्त करण्यात यश मिळवले आहे.

إرسال تعليق