खामगावात 12 गाळ्याची चर्चाच चर्चा...,
खामगावच्या गांधी उद्याना जवळ 45 लाखाचं गाळं
खामगाव (नितेश मानकर) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. गेल्या दोन दिवसांपूर्वी खामगाव येथील गांधी उद्यान जवळील न प चे बारा दुकाने चर्चेचा विषय ठरली आहे. या ठिकाणी झालेला लिलाव यासंदर्भात अनेक चर्चा बाहेर येत आहेत. सरकारी किमतीपेक्षा सात पट जास्त बोली लागल्याचे यावेळी पाहण्यात आले. निर्माण झालेल्या १२ गाळ्या पैकी ६ नंबरच्या गाळ्याची बोली ४५ लाखाच्या वर लागल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
शहर पोलीस स्टेशननजीक गांधी बगीच्या समोर उभारण्यात आलेल्या न. प. कॉम्प्लेक्स मधील दुकाने खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ८ सप्टेंबर रोजी या दुकानांचा ऑनलाइन लिलाव झाला. यामध्ये ठरविण्यात आलेल्या सरकारी किंमतीच्या ३ ते ७ पट अधिक बोली लावून ही दुकाने घेण्यात आली. परिणामी या १२ दुकानांच्या लिलावातून नगर पालिकेला तब्बल ३ कोटी ४४ लाख १० हजार अनामत रक्कम जमा होणार आहे. या ठिकाणी आणखी बांधकाम सुरूच असल्याने आता मोठी मिळकत नगरपालिकेला मिळणार आहे.


Post a Comment