माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत सजनपुरी अमरावती विभागातून दुसऱ्या क्रमांकावर:१५ लाखाचे बक्षीस जाहीर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : शासनाच्या माझी वसुंधरा 4.0 सन २०२४ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सजनपुरी ग्रामपंचायतीला अमरावती विभागातून लोकसंख्या नुसार दुसरा क्रमांक मिळाला आहे. ग्रामपंचायत पर्यावरण संवर्धना च्या कामासोबतच भूमी ,जल ,वायू ,अग्नी आणि आकाश अशा निसर्गाच्या पाच घटकांवर विविध योजना राबविल्या. गावात वृक्षारोपण करणे ,पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करणे, गटारी वाहत्या ठेवणे आणि पाण्याचे संवर्धन करणे.हवेचे प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छ हवेचे वातावरण तयार करणे.ऊर्जा संवर्धनाचे प्रयत्न करणे आणि ऊर्जेचा योग्य वापर करणे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि आवश्यक उपक्रम राबवत्यामुळे सदर पुरस्कार देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बी.आर.मघाडे यांनी दिली .
दरम्यान उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी गटविकास अधिकारी राजपूत सहाय्यक गटविकास अधिकारी शेख ,पेरे पाटील यांनी सरपंच मेहरून निसा सय्यद अकबर ,ग्राम विकास अधिकारी बी आर मघाडे यांचा सत्कार केला.


Post a Comment