एमसीएन न्यूज मराठी या न्यूज चॅनलचा बारावा वर्धापन दिन साजरा
खामगाव प्रतिनिधी शेख अजीज यांच्या प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : एमसीएन न्यूज मराठी या न्यूज चॅनलचा बारावा वर्धापन दिवस 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भावनांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी mcn न्युज मराठीच्या विविध जिल्ह्याचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी प्रसेंजित पाटील , गजानन वाघ, रंगराव देशमुख, डॉ किशोर केला, एड संदीप उगले, पोलीस निरीक्षक श्रीकांत निश्चळ , संदीपकुमार मोरे, मुख्याधिकारी सुरज जाधव,श्रीकांत जोशी, अजय वाढे, निलेश भेलके यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानंतर या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ झाला.या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त एमसीएन न्यूज मराठी साठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी खामगाव तालुक्याचे प्रतिनिधी शेख अजीज यांच्या प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे संचालन अनिल भगत तर प्रास्ताविक एमसीएन न्यूज मराठीचे संपादक राजीव वाढे यांनी केले. या वर्धापन दिन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांसह पत्रकार बांधवांचे आभार न्यूज चॅनलचे मुख्य संपादक शामकुमार तायडे यांनी मानले.

Post a Comment