पोलिसांच्या मेहनतीला मिळाले रूप: खामगावात शांतता व सुव्यवस्थेत गणेश विसर्जन!
खामगाव (नितेश मानकर)
जनोपचार न्यूज नेटवर्क : अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष असलेली खामगाव येथील श्री गणेश मिरवणूक शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विविध झांकी दर्शकांना दाखविली. दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी डोळ्यात तेल टाकून बंदोबस्त केल्याने अनुचित प्रकारही घडला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक क्षणीक लोढा, पीआयएलसीबी सुनील अंबुलकर ,ठाणेदार राजू पवार, सुरेंद्र आहेरकर यांच्यासह पोलिसांचे विविध पथकांनी पार पाडलेल्या जबाबदारीचे खामगाव शहरातील सुज्ञ नागरिक कौतुक करीत आहेत.

Post a Comment