सीसीटीएनएस प्रणाली मानांकनात बुलढाणा पोलीस चौथ्या क्रमांकावर: बहुतांश पोलीस स्टेशनला अपडेट करण्याची गरज!
जनोपचार न्यूज नेटवर्क बुलढाणा :- सीसीटीएनएस प्रणाली मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दल राज्यात 4 थ्या क्रमांकावर असून पोलीस अधिक्षक श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगीरी सुरू आहे
सीसीटीएनएस हा राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प असुन एन.सी.आर.बी. नवी दिल्ली कडून सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येतो. सदर प्रकल्पाअंतर्गत बुलढाणा जिल्हयाचे 34 पोलीस स्टेशन संगणकीकृत असून संपूर्ण कामकाज ऑनलाईन सुरु असून माहे जाने 2025 पासून CCTNS प्रणालीतील फॉर्म फिडींग तसेच FIR Publish करण्यातही 10 पैकी 10 गुण मिळवुन कामकाजात राज्यस्तरावर बुलडाणा जिल्हा पोलीस दल पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनात उत्कृष्ठ कामगीरी बजावत आहे. मात्र बहुतांश पोलीस स्टेशन मधून एफ आय आर संगणकृत होत नाहीत या बाबतही पोलीस अधीक्षक तांबे यांनी मार्गदर्शन तत्व राबवण्याचे गरज आहे.
![]() |
| जाहिरात |
सीसीटीएनएस प्रणाली माहे जुन 2025 चे मानांकन नुकतेच जाहीर झाले असून बुलढाणा जिल्हा पोलीस दल राज्यस्तरावरील मानांकनात 04 था क्रमांकावर आहे. सदरची उत्कृष्ठ कामगीरी ही पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक तथा सिसिटीएनएस प्रणालीचे नोडल अधिकारी अमोल गायकवाड, सीसीटीएनएस प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक सचिन पाटील सोबत पोहेका सुनिल वाघमारे, पोका किरण चिंचोले, मपोहेका दिपामाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, नापोका संतोष कायंदे, मपोहेका दिपाली खर्चे यांनी बजावली आहे. तसेच पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी सीसीटीएनएस बुलढाणा यांना यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत.


Post a Comment