हरवलेले सात मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी शोधले : CEIR पोर्टल चा झाला महत्वाचा उपयोग
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- विविध भागातून गहाळ झालेल्या सात मोबाईलचा छडा अखेर शिवाजीनगर पोलिसांनी लावलाच. शहरातील वेगवेगळ्या भागातून मोबाईल धारकांचे मोबाईल दहा झाले होते दरम्यान त्यांनी शिवाजीनगर पोलिसात मोबाईल हँडसेट मिसिंग / गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदल्या त्यापैकी 07 नग मोबाईल CEIR पोर्टल द्वारा शोधून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर ठाणेदार पोलीस स्टेशन शिवाजीनगर खामगाव यांच्या मार्गदर्शनात पोहेका.देवेंद्र शेळके ,राजू कोल्हे यांनी केली.


Post a Comment