प्रियकर साहिलने स्वतःवर केले 6 तर प्रेयसी ऋतुजा वर केले 16 वार!!

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: हॉटेल जुगनू लॉज वर दोन दिवसा अगोदर घडलेल्या खून व आत्महत्या प्रकरणात इन्क्वेस्ट पंचनामा व शेव विच्छेदनानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत त्यापैकी शरीरावर किती घाव आहेत ही माहिती आता समोर आली आहे. साहिल व ऋतुजाची मृतदेह २४ सप्टेंबर रोजी शवविच्छेदन गृहात केलेल्या इन्क्वेस्ट पंचनाम्यात ऋतुजावर छाती च्या मध्यभागीत तसेच शरीरावर विविध ठिकाणी तब्बल १६ वार असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये एक बार तिच्या हातावर सुध्दा होता. यावरुन ऋतुजाने प्रतिकाराचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. तर साहीलने स्वतःच्या छातीवर व पोटावर ६ घातले.

सिसीटीव्ही फुटेजची ठरणार महत्वाची भूमिका

या घटनेवरून अनेक प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. खून करून तिसरा व्यक्ती फरार झाल्याची अफवाही झाली होती. वास्तविक पाहता या हॉटेलमधील रुमनध्ये जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील सिसीटीव्हीत केवळ साहिल व ऋतुजाच जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिरा या व्यक्तीने प्रवेश केल्याचे रप्ष्ट होत नाही. तरोव प्रेमी युगल आंतरधर्मीय अराल्यची अफवाही होती. परंतु तपासात हे प्रेमीयुगल आंतरधर्मोय नसून आंतरजातीय असल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत या घटनेबाबत अनेक खुलासे सिसीटीव्ही फुटेजवरुन झाले आहे. त्यामुळे पोलीस तपासात आता सीसीटीव्ही फुटेजची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم