श्री अग्रसेन जयंती महोत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : महाराजा श्री अग्रसेन यांची ५१५० वी जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.१३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत श्री अग्रसेन जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट खामगाव येथे करण्यात आले होते. महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त सुरूवातीलाच मोठ्या प्रमाणात शहरात आतिषबाजी करण्यात आली.
श्री अग्रसेन जयंती समारोहचे मुख्य अतिथी प्रसिध्द उद्योगपती, जनरल फिजीशीयन अॅण्ड सर्जन श्रीमान डॉ. मनोजजी रामबिलासजी अग्रवाल (अंदुरावाले) हे होते, तर जयंती समारोह २०२५ चे अध्यक्ष सुप्रसिध्द उद्योगपती व समाजसेवक श्री संतोषजी सत्यनारायणजी डिडवाणीया हे होते. अग्र ध्वजारोहण श्रीमान सुरेशचंद्रजी रतनलालजी केजडीवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. श्री उज्वल घनश्यामजी गोयनका अध्यक्ष श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२५, श्री सुरज बजरंगलालजी अग्रवाल अध्यक्ष श्री अग्रसेन भवन मंडल खामगांव, सौ. पद्मा दिनेशजी सुरेका अध्यक्षा अग्रवाल महिला मंडळ, सौ. कविता प्रेमजी अग्रवाल, अध्यक्षा अग्रवाल बहुबेटी मंडळ यांच्या अध्यक्षतेत श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
श्री अग्रसेन जयंती महोत्सवा दरम्यान अग्र प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा, अग्र वुमन प्रिमिअर लिग स्पर्धा, म्युझीकल चेअर, पोता दौड, निंबु चम्मच, फिजीओ थेरपी अॅण्ड फ्रि हेल्थ चेकअप कॅम्प, रक्तदान शिबीर, हेल्दी बेबी स्पर्धा, डिस्पोजेबल से सेल्फी बनाओ, सामाजीक संदेश देती नाटीका, साप सिडी, पापड के फोल्ड के डेकोरेशन, श्याम बाबा की माला बनाओ, कपास की बाती बनाओ, हर अंदाज साडी के साथ, राजस्थानी डान्स स्पर्धा, मॅगी विथ डिफरंट तडका, रंगोली से पशु बनाओ, अग्र कार्निव्हल, सांस्कृतीक कार्यक्रम, रंगभरो, चेस, आनंद मेला, देशभक्ती एवंम भगवान कि वेशभुषा फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. विजयी स्पर्धकांना विविध पारितोषीकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी शहरातून भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराजाधिराज श्री अग्रेसनजी यांची शोभायात्रा अग्रसेन भवन येथुन शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली होती. यावेळी उंट, घोडे, आतिषबाजी हे शोभायात्रेचे आकर्षण होते. यावेळी अग्रवाल समाजातील समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती व शोभायात्रेचे शहरात जागोजागी आतिषबाजी व स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री अग्रसेन भवन मंडळ, श्री अग्रवाल युवक मंडल, श्री अग्रवाल महिला मंडळ, श्री अग्रवाल बहूबेटी मंडल, श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२५, श्री अग्रसेन स्मारक समिती यांनी अथक परिश्रम घेतले. वरील माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका यांनी दिली.

إرسال تعليق