मराठा आंदोलन कर्त्यांसाठी वाडी(खामगाव) येथून खाद्य मदत मुंबईला रवाना
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : मुंबई येथे सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलनाला राज्यभरातून सर्वच समाज तसेच संघटना मदत करीत आहे विशेष करून मुस्लिम समाजाचे मोलाचे योगदान आहे त्या अनुषंगाने काल रात्री खामगाव शहर लागत असलेल्या वाडी गावातील मराठा तसेच बौद्ध बांधवांनी व गावकऱ्यांनी मुंबई येथे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलना त सहभागी झालेल्या राज्यभरातून लाखो मराठासमाज बांधवां साठी खाद्य मदत पाठवण्यात आली ही मदत टाटा एनटरा गाडी तसेच अल्टरिका याच्या साह्याने पाठवण्यात आली वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री ईश्वरजी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली तर आदरणीय श्री गजानन हेलोडे काका यांच्या मार्गदर्शनात ही मदत पाठवण्यात आली यावेळी संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष दशरथ घुले विठ्ठल वडकर गजानन गावत्रे सचिन देशमुख सुधीर वाकोडे पिंटू खोंड अजय खोद्रे राजू अंभोरे गणेश सपकाळ निखिल देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर मराठा व बुद्ध बांधव तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती

Post a Comment