गजानन लोखंडकार यांची बीड व जालना जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क प्रहार जनशक्ती पक्ष हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा, शोषित–पिडित व वंचितांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. या पक्षाच्या संघटनेला बीड आणि जालना जिल्ह्यात अधिक बळकटी देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.गजानन लोखंडकार यांची प्रहार जनशक्ती पक्ष – बीड व जालना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गजानन लोखंडकार यांनी शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी झटणे हा त्यांचा स्वभाव आहे.नियुक्तीनंतर लोखंडकार यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की,“ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची आहे, पण त्याहूनही मोठं कर्तव्य आहे.प्रहार पक्ष प्रमुख बच्चूभाऊ कडू, प्रहार पक्ष कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ ,पक्ष नेतृत्व, ज्येष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

Post a Comment