वोबीसी मुस्लिम खाटीक समाजाची जिल्हा बैठक संपन्न 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : ओबीसी मुस्लिम खाटीक समाज संघटनेची बांधणी आता संपूर्ण राज्यभर होत असून विखुरलेल्या मुस्लिम खाटीक बांधवांना एकत्र करण्याचं काम या संघटने कडून होत आहे त्या अनुषंगाने विदर्भामध्ये या संघटने ची 9 ऑगस्ट अकोला येथे समाज बांधवांची बैठक संपन्न झाली असून काल बुलढाणा जिल्ह्याची खाटीक समाज बांधवांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक खामगाव येथे हॉटेल एजे च्या हॉलमध्ये पार पडली या बैठकीस संपूर्ण जिल्ह्या तून फार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम खाटीक बांधवांची उपस्थिती होती या बैठकीला व्यासपीठावर प्रामुख उपस्थिती. 

अक्रम कुरेशी राजू भाई मजल भाई इक्बाल चौधरी आरिफ भाई मुजाहिद भाई अस्लम भाई उमेर भाई हे होते तर खामगावचे माजी नगर सेवक फारुख भाई लालाभाई हुसेन भाई अजहर भाई मुन्नाभाई मजल भाई यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती या बैठकीमध्ये मा. अक्रम कुरेशी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की समाजातील मुला मुलींना उच्चशिक्षित करण्याकरता आपण प्रयत्नशील असलो पाहिजेत ओबीसी मुस्लिम खाटीक सामाजिक संघटना ही पिढी दर पिढी चालत असलेला व्यवसाय या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यवसायाकडे नोकरी उद्योग धंद्याकडे जाऊन भविष्य उज्वल करत असणारे समाजातील युवक अशा युवकांना संघटनेच्या कडून प्रोत्साहन दिले जाणार त्याचप्रमाणे समाज बांधवांनी व्यर्थ होणारा खर्च टाळावा यासह अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले तसेच आलेल्या मान्यवरांनीही या बैठकीत संघटनात्मक दृष्टिकोनातून आप आपले विचार मांडून मार्गदर्शन केले जिल्ह्याच्या या बैठकीसाठी जिल्हाभरातून आलेल्या समाज बांधवांसाठी चहा नाश्ता तसेच स्नेहभोजनाची सुंदर अशी व्यवस्था आयोजन समितीचे प्रमुख आबीद उलहक तसेच आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post