दुर्दैवी रात्र : दोन अपघातात तिघे ठार; एक गंभीर : खामगावात शोककळा

खामगाव अकोला महामार्गावर ट्रक अपघातात दोन ठार

खामगाव : रस्ता अपघातांचे प्रमाण वाढतच चालले असून काल मध्यरात्री व आज पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. खामगाव- नांदुरा रोडवर काल मध्यरात्री भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला आहे, तर आज ३ सप्टेंबर रोजी पहाटे खामगाव अकोला महामार्गावर लाकडी पुलावर रोडच्या कडेला  उभ्या असलेल्या ट्रकवर मागून भरधाव वेगात आलेला  ट्रेलर आदळून झालेल्या भीषण अपघातात सदर ट्रेलर मधील दोघे जागीच मृत्यूमुखी पडले.

      स्थानिक देशमुख प्लॉट भागातील मुकेश बजरंग शर्मा (२७) व सुरज घाडगे (२५) हे दोघे काल २ सप्टेंबरच्या रात्री मलकापूर येथून खामगावकडे दुचाकीने येत होते. दरम्यान खामगावकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सदर दुचाकीला खामगाव-नांदुरा रोडवरील सैनिक ढाब्यासमोर  रात्री ११:३० च्या सुमारास जोरदार धडक देऊन चिरडले. या भीषण अपघातात दुचाकी वरील  दोघेही गंभीर जखमी झाले होते. काही वेळाच यातील मुकेश शर्मा या तरुणाचा  जागीच मृत्यू झाला.  तर सुरज गादगे हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथील आयकॉन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतक मुकेश हा टाटा फायनन्समधे  व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता तर कुरिअरच्या पार्सल पोहचविण्याचे काम करीत होता. त्याचा अकाली निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

      तर दुसरा  अपघात आज पहाटे खामगाव -अकोला रोडवरील लाकडी पुलावर घडला. या ठिकाणी एक ट्रॅक रोडच्या कडेला उभा होता. दरम्यान पहाटे मागून भरधाव वेगात आलेला ट्रेलर सदर ट्रकवर मागून जोरात आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकणाऱ्या ट्रेलरची संपूर्ण केबिन ट्रॅक मध्ये घुसली. या भीषण अपघातात ट्रॅक धडक देणाऱ्या ट्रेलरचा चालक व क्लिअर दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रेलरमध्ये अडकलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. वृत्तलीहेपर्यंत पोलिस कार्यवाही सुरू होती.

Post a Comment

Previous Post Next Post