चंदनशेष मंदिरात महालक्ष्मीची आराधना
संत जनाबाई भजनी मंडळाचा धार्मिक कार्यक्रम
खामगाव जनोपचार : सर्वत्र गौरी गणपतीची स्थापना होत असताना येथील सुप्रसिद्ध असलेल्या चंदनशेष महाराज मंदिरात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली महालक्ष्मीच्या स्थापने निमित्त वारकरी परिषदेची सलग्न असलेल्या व भारतीय साहित्य परिषदेत नामांकन मिळवलेल्या संत जनाबाई भजनी मंडळ सुटाळा बु येथील महिलांनी भजनी संध्याकाळी उपस्थित नागरिकांचे मने जिंकले व धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या भजनाची सांगता महाआरतीने करण्यात आली या भजनी मंडळात चंदाबाई पांडुरंग खोटे लक्ष्मीबाई गोविंदा ठाकरे संगीता अशोक देशमुख वसूबाई निवृत्ती उमाळे सुलोचना गजानन काळपांडे रेखा महादेव धुळे बेबी नंदा वसंता इंगळे कोकिळा त्रंबक चव्हाण सुशिलाबाई भागवत अवधूत प्रमिला विठ्ठल सोडके वैशाली रमेश महाजन पूजा रवींद्र किरोचे रूपाली संतोष नाटेकर अनिता गजानन पुंडेकर सुनीता सुनील माटे शोभा श्रीकृष्ण धोटे मृदुंगाचार्य कैलास कंठाळे वनिता वसंता इंगळे शालिनी मारुती गावंडे अलका गुळवे अंजनी जाधव मंदाकिनी तायडे नंदिनी पवार माधुरी जाधव सुहानी वायसे वंदना देशमुख पूजा धुमाळ लक्ष्मी माकोडे या महिलांनी सहभाग घेतला होता संत जनाबाई भजनी मंडळाच्या या महिलांचे सर्वत्र कार्यक्रम होत असतात आकर्षक स्वर व मृदंग वाद्यासह या महिलांचे पंचक्रोशीत भजनी मंडळाचे मोठ्या प्रमाणात नाव आहे
सदरच्या भजनी मंडळाला राज्यस्तरावर सुद्धा आता नामांकन मिळाले असून त्यासाठी लक्ष्मीबाई गोविंदा ठाकरे तालुका अध्यक्ष चंदाबाई पांडुरंग कोयते तालुकाध्यक्ष स्मिता अशोक देशमुख तालुका सचिव सुलोचना गजानन काळपांडे कोषाध्यक्ष रेखा महादेव धोटे तालुका कार्याध्यक्ष व नलिनी निवृत्ती उमाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न घेतले


Post a Comment