श्रीकृष्ण च्या रुपात गणपतीची मूर्ती भावीकांसाठी आकर्षण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : श्रीकृष्ण नवयुवक सांस्कृतीक क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळ आठवडी बाजार खामगाव या मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गणेश उत्सव निमित्त भव्यदिव्य अशी मनमोहक सुंदर भगवान श्रीकृष्ण च्या रुपात श्रींची मूर्ती व सोबत राधा ची मूर्ती वृंदावन मध्ये बसलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
मंडळाच्या वतीने सदर मूर्तीच्या माध्यमातून राधा-कृष्ण हे हिंदू धर्मातील देवता आहेत, जिथे राधा ही कृष्णाची प्रेयसी आणि भक्तीची देवी आहे, तर कृष्ण हे प्रेम, करुणा आणि जगाला मंत्रमुग्ध करणारे देव आहेत. राधा ही लक्ष्मीचा अवतार आणि कृष्णाची आंतरिक शक्ती मानली जाते. त्यांना एकत्र राधा-कृष्ण म्हणतात, जे शाश्वत प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहेत आणि अनेक वैष्णव संप्रदायांमध्ये लक्ष्मी-नारायणाचे अवतार म्हणून ओळखले जातात . असा संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे .


Post a Comment