खामगाव शहरासाठी एक आनंदाचा क्षण
विसर्जन घाटाचे निर्माण पूर्णत्वास: उद्या लोकार्पण

या घाटापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यापासून (जनुना, जळका तेली रोड) थेट काँक्रीट रस्त्या वरून जाता येईल
खामगाव (नितेश मानकर):- जनुना तलावावर विसर्जन घाटाचे निर्माण पूर्णत्वास आले असून, त्याच्या लोकार्पणाच सोहळाउद्या दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.
गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि एकात्मतेचा सण आहे. शहरातील विविध गणेश मंडळांना थेट तलावाच्या काठावरून विसर्जन करताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. भक्तिभावाने केलेल्या विसर्जन सोहळ्यात मनामध्ये आनंद असला तरी सोयींचा अभाव नेहमीच जाणवत होता. याच भावनेतून आणि श्रद्धेच्या प्रेरणेने या घाटाची संकल्पना ना. आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून साकार झाली. निर्माण झालेल्या पक्क्या घाटामुळे मूर्ति विसर्जनाची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. या घाटापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यापासून (जनुना, जळका तेली रोड) थेट काँक्रीट रस्त्याचे बांधकामही करण्यात आले आहे. त्यामुळे विसर्जन सोहळा अधिक सुव्यवस्थित आणि सोयीस्कर ठरणार आहे. गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, व जगदंबा उत्सवासाठी सुद्धा हा विसर्जन घाट उपयोगी ठरणार आहे.
हा घाट केवळ एक सुविधा नसून, आपल्या परंपरेचे रक्षण करणारा आणि भाविकांच्या श्रद्धेला आधार देणारा ठरेल, असा मला विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान भविष्यात गणेशभक्तांच्या मागणीनुसार आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा घाटावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन नामदार आकाशदादा फुंडकर यांनी जनोपचारच्या माध्यमातून दिले.

Post a Comment