दुचाकी अपघातात गोंधनापूर येथील पेंटर चा मृत्यू
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-दुचाकी अपघातात गोंधनापूर येथील युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास शिरसगाव देशमुख जवळ घडली. गणेश शंकर राखोंडे वय अंदाजे 38 राहणार गोंधणापूर असे मृतकाचे नाव आहे. गणेश राखोंडे हे घराला रंगरंगोटी चे काम करीत होते .आज संध्याकाळी ते खामगाव येथून घरी जात असतानाच काळाने घाला घातला. अज्ञात वाहनाने धडक दिल्या मुळे सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तलेपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
![]() |
| जाहिरात |


إرسال تعليق