गो.से महाविद्यालयात स्व.ॲड. शंकररावजी बोबडे जयंती सप्ताहचे उद्घाटन

स्व. ॲड. भाऊसाहेब बोबडे‌ दूरदृष्टीचे समाजसेवक होते - राजेश राजोरे

खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगावद्वारा संचलित गो. से .विज्ञानकला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांची १११ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जयंती सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटन प्रसंगी राजेश राजोरे (आवृत्तीचे संपादक दै. देशोन्नती बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुभाषराव बोबडे (अध्यक्षविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव)मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाशजी तांबट, अजिंक्य शंकरराव बोबडेउपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळेसमन्वयक डॉ. डी. एन. व्यासव्यासपीठावर उपस्थित होते. 



प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या प्रसंगी राजेश राजोरे (आवृत्तीचे संपादक दै. देशोन्नती बुलढाणा) यांनी भाऊसाहेबांचा जीवन प्रवास खामगावकर आणि जिल्ह्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. ते खामगाव नगरीचे चाळीस वर्ष नगराध्यक्ष होते. हा त्यांच्या राजकारकिर्दीतला अत्यंत दुर्मिळ असा राजकारणातील नगराध्यक्ष पदावर राहण्याचा उच्चांक आहे. ते अत्यंत मनमिळावू सुशील मितभाषी स्वभावाचे होते. नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. खामगाव नगरीच्या विकासामध्ये त्यांनी केलेले संकल्प पूर्णत्वास नेले. त्यांनी अनेक विकास काम खामगाव नगरीसाठी निर्माण करून ठेवले. त्यामध्ये नटराज गार्डन आणि जनुना येथे असलेले धरण आणि तेथे तयार केलेला विलोभनीय गार्डन त्यांच्या दिशादर्शक निसर्ग प्रेमाची आठवण आहे. खामगाव शहरात त्याच्या काळात रस्तेसडका व पूलबाजार वटे तयार करून खामगाव शहराला त्यांनी सुंदर केले. हा काळ १९६४ पासून चा आहे. त्यांना प्राप्त झालेल्या सत्ता व संपत्तीचा ‌वापर समाजातील गोरगरीब लोकांच्या उत्थानासाठी केला. खामगाव शहरातील अनेक लोकांना त्यांनी नगरपरिषद मध्ये रोजगार मिळवून दिला. तसेच गो. से. महाविद्यालयाच्या रूपाने ज्ञानगंगाच त्यांनी ग्रामीण भागासाठी निर्माण केली. अत्यंत प्रतिष्ठित असलेली ही शिक्षण संस्था दिवसेंदिवस त्यांच्याच विचारातून प्रगती करत आहे. या संस्थेतून अनेक विद्यार्थी शिकून समाजात मोठ्या पदावर गेले आहेत त्यामागे स्व. भाऊसाहेब  बोबडे यांच मोठं योगदान आहे. शिक्षणप्रेमी आणि शिक्षकप्रेमी  म्हणून त्यांची शिक्षण संस्थेत भूमिका राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले पाहिजेत असा त्यांचा विचार होता. खेड्यापाड्यातील विद्यार्थी बाहेर शहरात जाऊ शिक्षण घेऊ शकत नाहीत हे त्यांनी त्या काळात जाणले होते. म्हणूनच आपल्या महाविद्यालयात शहरातल्या‌सारख्या शिक्षण विषयक सोयी सुविधा निर्माण केल्या. विज्ञान शाखेची सुरुवात हा त्याचाच भाग आहे. शेतकरीव्यापारी व सामान्य मजूर वर्गावर आपल्या कर्तुत्वाने माया करणारा स्वर्गीय भाऊसाहेबसारखा समाजसेवक खामगाव नगरीचे‌ भूषण होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळे यांनीही भाऊसाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की शिक्षकांना आपल्या शिक्षण संस्थेत त्यांनी नियमित आदराची वागणूक दिली मोठी माणसं ही मोठ्या मनाची असतात असं त्यांचं व्यक्तिमत्व आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे असे डॉ. प्रफुल उबाळे यांनी सांगितले. जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ. डी. एन. व्यास यांनी सुद्धा भाऊसाहेबांच्या उभ्या केलेल्या कार्यकर्तृत्वाला वंदन केले भाऊ साहेबांचा विचार शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांसाठीच लाभदायी आहे व प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे संचालन डॉ. रोहिणी धर्मकार यांनी केले तर आभार डॉ. अशोक पडघान यांनी मानले. या कार्यक्रमाला मा. डॉ. प्रशांत जी बोबडे (सचिवविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव)मंडळाचे संचालक श्री. रवी श्याम महर्षीश्री. अशोकभाऊ सोनवणेतसेच संस्थेचे पदाधिकारीमहाविद्यालयातील सर्व विभागप्रमुखप्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारीव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. विक्रम मोरे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post