बुलढाणा जिल्हयातील १३ तालुक्याच्या बस स्थानकावर साहीत्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा लावावी - लहुजी विद्रोही सेना

खामगाव - बुलढाणा जिल्हयातील १३ तालुक्याच्या बस स्थानकावर साहीत्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा लावावी अशी मागणी लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने करण्यात आली.



 जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदन मध्ये म्हटले आहे की, आमच्या समाजाचे साहीत्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगष्ट व आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती १४ नोव्हेंबर रोजी असते या दोन्ही महापुरुषांच्या जयंती निमित्य बुलढाणा जिल्हयातील सर्व १३ तालुक्याच्या बस स्थानकामध्ये या दोन्ही महापुरुषांची प्रतिमा लावण्यात यावी. समाज जागृत करण्याच्या उद्देशाने व समाजाला महापुरुषांचे इतिहास व त्याग समजावे तसेच युवा पिढीला त्यांचे पासुन काही नविन प्रेरणा मिळेल. बुलढाणा जिल्हयातील काही तालुक्यातील बस स्थानकामध्ये साहीत्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा लावलेली आहे. तर काही बस स्थानकामध्ये या दोन्ही महापुरुषांची प्रतिमा लावलेली नाही. या उद्देशाने आपण सर्व तालुक्यातील आगार व्यवस्थापक यांना या दोन्ही महापुरुषांची जयंतीच्या दिवशी प्रतिमा लावण्याचे आदेश द्यावे ही नम्र विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post