महिला महाविद्यालयाची कु. प्रणाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ  आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत अव्वल 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक श्रीमती सु.रा.मोहता महिला महाविद्यालय, खामगाव ची विद्यार्थिनी कु. प्रणाली संजय शेगोकार हिने नुकत्याच अमरावती येथे संपन्न झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच आर डी आय के महाविद्यालय बडनेरा व अभिनंदन बँक अमरावती यांच्या सहकार्याने आयोजित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत महिला विभागातून  कु. प्रणाली संजय शेगोकार हिने दहा किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथम येऊन पुन्हा यावर्षी अव्वल स्थानी राहिली आहे. अत्यंत मेहनती असलेल्या प्रणालीची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी साठी प्रणाली पात्र ठरली आहे. विदर्भयुथ वेल्फेअर सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच अभिनंदन बँकेचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत कुमारी प्रणाली व प्राध्यापक डॉक्टर सीमा देशमुख यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post