राजेंद्र बघे यांच्या सतत पाठपुरावाचे फलीत
अखेर पिंपळगाव राजा मार्गे ढोरपगाव,भालेगाव एसटी बस सेवा झाली पूर्वरत
जनोपचार न्यूज नेटवर्क : मागील सहा महिन्यापासून रस्त्या दुरुस्तीच्या कारणास्तव पिंपळगाव राजा मार्गे ढोरपगाव,भालेगाव बसेस बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगिनी यांनी निवेदनाचा सपाटा लावून पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज सदर बस पूर्ववत सुरू करण्यात आली.
पिंपळगाव राजा मार्गे पूर्ववत बस सेवा सुरू करण्याकरिता डेपो मॅनेजर अकोट साहेब यांची वेळोवेळी भेट घेतल्यानंतर त्यांनी रोड दुरुस्ती असल्याचे प्रमाणपत्र बांधकाम विभाग यांनी दिल्यानंतरच आम्ही बस सेवा सुरू करू शकतो.
त्यानंतर वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागांला संपर्क केला असता खामगाव पिंपळगाव राजा रोड आमची अंडर मध्ये येत नाही याची एजन्सी दुसरी आहे.
आम्ही त्यांना काही वर्षासाठी रस्ता हॅन्ड वर केला आहे. म्हणून आम्ही पत्र देऊ शकत नाही,कोणी म्हणायचं मेन ऑफिस मेहकर ला आहे, कोणी म्हणायचं अकोला कोणी म्हणायचं अमरावती परंतु अखेर सततच्या पाठपुरामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ता एसटी बस जाण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले.
त्यानंतर वेळोवेळी सांगितल्यानंतर एस टी महामंडळ यांच्याकडून सर्वे करण्यात आला.
अखेरीस सर्वांच्या पाठपुराव्यांना यश मिळत पिंपळगाव मार्गे बस सेवा सुरू सुरू करण्यात आली.
शिवसेनेच्या वतीने चालक वाहक यांचा सत्कार करण्यात आला.
एसटी बस पूर्वरत सुरू झाल्यामुळे विद्यार्थी,तसेच विद्यार्थिनी,नागरिक यांनी समाधान व्यक्त केलं.
एसटी टाईम टेबल
सकाळी 7:30
सकाळी 9:00
सकाळी 11:15
दुपारी 2:00
दुपारी 4:00
संध्याकाळी 6:00
रात्री 8:00
टाईम टेबल मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत.
परंतु येत्या काही दिवसात सर्व टाईम सुरळीत होतील असे मॅनेजर अकोट साहेब यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना,शहरप्रमुख चेतन ठोंबरे,उपशहर प्रमुख भाऊबीडकर,मा.सरपंच जनार्दन मोरे,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,धम्मपाल गवई,शेख समीर,शेख फैजू, यांच्या सह विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
![]() |
| जाहिरात |


Post a Comment