पिंपळगाव राजा पीएससी सेंटरची अशी ही रुग्णसेवा

रुग्णसेवा करताना आशा सेविका सौ चेतना मानकर सौ सोनी भोंडे

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : राज्यात मोठ्या भक्ती भावाने साजरा होणारा भक्ति महोत्सव म्हणजे शारदोत्सव. राज्यसह खामगाव तालुक्यातील घाटपुरी जगदंबा संस्थान येथेही मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्त जगदंबेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. बुलढाणाच नव्हे तर अमरावती ,अकोला ,यवतमाळ, वाशिम ,मुंबई पुणेसह अनेक जिल्ह्यातून भावीक मोठ्या भक्ती भावाने देवीचे दर्शन करण्यासाठी येत असतात. यादरम्यान भाविकांची आरोग्याची निगा राखण्याचे काम तालुक्यातील पिंपळगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र घेत असते. दरवर्षी या ठिकाणी डॉक्टरांसह आशा ताईंची टीम उत्साह पूर्ण वातावरणात सेवा देत असतात. आरोग्यातून सेवा देण्याचे हे काम अत्यंत मधुर वाणीतून केल्या जाते. अविरत नऊ दिवस ही सेवा देण्यात येत असल्याने भाविकांमध्ये कौतुक व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post