शिवनेरी ग्रुप द्वारा आयोजित नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

खामगाव:( नितेश मानकर )स्थानिक शिवनेरी ग्रुप खामगाव च्या वतीने नवरात्री उत्सवामध्ये  भव्य दिव्य नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 चे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नगर परिषद शाळा क्रमांक ६, टॉवर चौक खामगाव येथे 22 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर पर्यंत रोज सायंकाळी६ ते १० वाजेपर्यंत करण्यात आले येत असते. नेहमी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवनेरी ग्रुपने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य अश्या नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर रोजी  गरबा उत्सवाचे भव्यदिव्य उदघाटन वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक श्री सागर दादा फुंडकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष स्वप्निल दादा ठाकरे पाटील, महिंद्र  रोहनकार, सौ मीनाकाकू जांगिड.गणेश खारोडे सर, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर आप्पा भोसले यांच्या उपस्थिती संपन्न झाला. यावेळी शिवनेरी ग्रुप चे संस्थापक रवी जांगिड,किशोर लोखंडे,जिल्हा अध्यक्ष अभिषेक रोहणकार, गरबा उत्सव समिती 2025 चे अध्यक्ष हर्ष (गोलू) महातो ,शहर अध्यक्ष प्रतीक मुंढे पाटील, ऋषिकेश कावणे, संकेत सुराणा,यश भागदेवाणी,प्रसाद बाठे, पवन डिक्कर, सुरज वडोदे, श्याम मोरे आदी उपस्थित होते.या 10 दिवसाच्या भव्य दिव्य उत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान शिवनेरी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post