ॲड. शंकरराव उपाख्य भाऊसाहेब बोबडे परिसरात चिल्ड्रन पार्कचे लोकार्पण
डॉ.प्रशांत बोबडे व श्रद्धाताई बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) – स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान खामगाव नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष, माजी खासदार, माजी अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ तसेच ‘खामगाव रत्न’ स्व. ॲड. शंकरराव उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्व. ॲड. शंकररावजी ज्ञान मंदिर परिसरात लहान मुलांसाठी आकर्षक चिल्ड्रन पार्क उभारण्यात आले असून, याचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री मा. आ. आकाश दादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिव मा. डॉ. प्रशांत बोबडे व सौ. श्रद्धा ताई बोबडे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. नवीन पार्कमध्ये मुलांसाठी मनोरंजनासोबत शारीरिक व मानसिक विकास साधणारी विविध खेळणी यंत्र बसविण्यात आली आहेत. त्यात प्रमुखत झुले, घसरगुंडी, फिसंडी, मंकी बार, क्लायंबिंग नेट व चढाईची साखळी, मेरी-गो-राऊंड, स्प्रिंग रायडर्स व बॅलन्स गेम्स, लहान मुलांसाठी वाळू खेळण्यासाठी स्वतंत्र जागा यामुळे मुलांच्या शारीरिक ताकदीसोबत संतुलन, चपळता, सहकार्यभावना आणि आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. तसेच बाहेर खेळण्याची सवय निर्माण होऊन तणावमुक्त वातावरण लाभेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांबरोबरच खेळातून आरोग्यपूर्ण जीवनशैली जोपासण्याची संधी मिळणार आहे. या प्रसंगी मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ), मा. प्रकाश तांबट (उपाध्यक्ष), मा. अजिंक्य बोबडे (कोषाध्यक्ष), ॲड. अनिल व्यास, श्री. निलेश देशमुख यांच्यासह मंडळाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, सप्ताह समन्वयक प्रा. डॉ. डी. एन. व्यास, प्रा. डॉ. हनुमंत भोसले, प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. एस. टी. वराळे, प्रा. एन. बी. कुटेमाटे, प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख, प्रा. व्ही. यु. मोरे, प्रा. डॉ. ए. ए. तायडे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. डॉ. अनुराग बोबडे आदी प्राध्यापक, सर्व विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Post a Comment