बापरे बाप.... खामगावात पावणेदोन कोटीने फसवणूक!
सेटलमेंट झालीच नाही...अखेर रिशी खत्री विरुद्ध गुन्हा दाखल
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) स्थानिक दोन मोठ्या व्यापाऱ्यांकडून दागिन्यांची खरेदी करून छोट्या व्यापाऱ्याने दिलेले सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे दोन चेक बाउन्स झाल्या प्रकरणी खामगाव पोलिसांनी आरोपी रीशी संदीप खत्री याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव हे सोने चांदी बाजारासाठी प्रसिद्ध व्यापार पेठ आहे यामध्ये काही व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याकडून दागिने खरेदी करून विकत असतात. असे व्यवहार सातत्याने होत असतो. या व्यवहाराच्या बदल्यात चेकने पैसे देण्याची सुद्धा पद्धत आहे. याच पद्धतीने व्यवहार करून फसलेल्या फिर्यादी जितेंद्र मुरलीधर सोनी व अभिषेक महेश शेलारका यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार आरोपी ऋषी संदीप खत्री याने व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करून जितेंद्र सोनी यांचे कडून 1 कोटी 37 लाख 40 हजार 557 रुपयाचे तसेच अभिषेक महेश शेलारका यांचेकडून 25 लाख 4 हजार 382 रुपयांचे दागिने खरेदी करून त्या बदल्यात धनादेश दिले. दरम्यान आरोपीने दिलेले धनादेश अनादरीत झाले आहेत. रीशी संदीप खत्री याने फिर्यादी तसेच अभिषेक महेश शेलारका यांच्यावर अन्यायाने विश्वासघात करून एकूण 1,62,44,939 रुपयांची फसवणूक केलेली आहे. अशा आशयाच्या फिर्यादवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी खत्री विरुद्ध कलम 318 (4), 316 (2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.


إرسال تعليق