मुद्रांक खरेदीसाठी हातात फलक घेऊन जनजागृती

ॲड.विलास लोखंडे , सिद्धेश्वर स्वामी  यांनी हातात फलक घेऊन केली जनजागृती

अंबाजोगाई जनोपचार न्यूज नेटवर्क -: ५०० रुपयांचे  मुद्रांक बाँड आवश्यक असताना मुद्रांक विक्रेते यांचे म्हणजे १०० रुपयाचे मुद्रांक विक्रेत्या कडून घेऊन नोटरी हे अधिक दराने १०० रुपयांचे बॉण्ड २०० ते ३०० रूपये ग्राहकांना देऊन त्यांची फसवणूक करत आहेत.ही फसवणूक रोखण्यासाठी सोमवारी सकाळी ॲड.विलास लोखंडे व सिद्धेश्वर स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातात फलक घेऊन जनजागृती केली.

                   १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णया नुसार ५०० रुपयांचा मुद्रांक बाँड खरेदी करावा. व त्या नुसार व्यवहार करावेत.असा आदेश आहे .मात्र तरीही मुद्रांक विक्रेते व नोटरी अनेक ग्राहकांना १०० रुपयांचे बाँड चढ्या भावाने देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.ही फसवणूक रोखण्यासाठी तसेच नोटरी करताना वैधता नसताना व शिकल्यावर वैधता तारीख नसताना तारखेची फसवणूक होऊ नये.यासाठी ग्राहकांनी दक्षता बाळगावी. तसेच नोटरी नसतानाही अनेकजण नोटरी म्हणून सह्या करत आहेत.यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड.विलास लोखंडे व सिद्धेश्वर स्वामी जनजागृती मोहीम शहरात सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातात फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून १७ सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे ऍड.विलास लोखंडे व सिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم