लोक कल्याण मेळाव्यात फेरीवाल्यांना दिले प्रशिक्षण
शासन निर्देशानुसार खामगाव न.प. ने केले मार्गदर्शन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला आहे .दरम्यान आज दिनाक 26 सप्टेंबर रोजी डॉ.प्रशांत शेळके मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या माध्यमातून नगर परिषद खामगाव PMSVNIDHI योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या पथ विक्रेते यांचे साठी शासनाच्या विविध योजनांचा कॅम्प, व FASSAI लायसन्स बाबत प्रशिक्षण आयोजित केले होते. यामध्ये फेरीवाल्यांनी चांगली उपस्थिती दर्शविली. यावेळी योगेश बनचोडे, जळगांव यांनी लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले.याप्रसंगी आनंद देवकाते उपमुख्याधिकारी,राजेश झनके शहर अभियान व्यवस्थापक, निलेश पारसकर,आकाश राऊत उपस्थित होते.


إرسال تعليق