प्रदीप सिरसाट यांना अर्थशास्त्र विषयात पीएचडी जाहीर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : तालुक्यातील मांडणी येथील रहिवाशी प्रदीप नागोराव सिरसाट यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी मिळवली आहे."पश्चिम विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत आठवडी बाजारांची भूमिका"या विषयावर गो.से.महाविद्यालय खामगाव चे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र कुमार गव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीला प्रदीप सिरसाट यांनी शोध प्रबंध सादर केला होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीने नुकतीच प्रदीप सिरसाट यांना पीएचडी जाहीर केली आहे. प्रदीप सिरसाट हे तालुक्यातील मांडणी या गावाचे रहिवासी असून या गावाचा डोंगरी विभागात समावेश आहे.त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.l फोटो - प्रदीप सिरसाट

Post a Comment