राणा नवयुवक दल सांस्कृतिक क्रीडा मंडळ वरणा द्वारा निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : श्री संत गुलाब बाबा विद्यालय कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय वरणा येथे राणा नवयुवक दल सांस्कृतिक क्रीडा मंडळ वरणा द्वारा आयोजित निबंध स्पर्धा दि.४ सप्टेंबर २०२५ वार गुरुवार रोजी पार पडली. या निबंध स्पर्धे मध्ये विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, असून पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी मध्ये प्रथम क्र. आरती संदीप इंगळे इयत्ता ८ वी, वेदिका भागवत वाघ इयत्ता ९ वी द्वितीय क्र. सुरज गजानन गवळी इयत्ता ७वी, वैष्णवी शामसिंग इंगळे इयत्ता १० वी. तृतीय क्र.तनुजा मेघराज इंगळे इयत्ता ८वी, रोषणाई प्रमोद इंगळे इयत्ता ९वी. प्रोत्साहन आरती गोविंदा हेलोडे इयत्ता ६ वी, वैष्णवी ईश्वरसिंग इंगळे पर यांना दि.८ सप्टेंबर वार सोमवार रोजी सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष राणा मुकुंदसिंग राजपुत यांच्या हस्ते तर सुनिलसिंग राजपुत, सुपडा पारस्कर, गजानन राजपुत शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर . ए .मोरे सर वरिष्ठ शिक्षक श्री सोळंके सर, ब्राह्मणकर सर. सुरगडे सर व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मंडळाचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश भातुरकर, संग्रामसिंग राजपुत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Post a Comment