शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व पिंपरी देशमुख येथील शेतकऱ्यांचे निवेदन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : एलोमोजाक चारको रोट या रोगाने काढणीला येण्यापूर्वीच सर्व सोयाबीन जढल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.शासन व प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी, उपविभागीयकृषी अधिकारी, तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
प्रामुख्याने पिंपरी देशमुख येथील मोठ्या प्रमाणात सोयाबीन वरती आलेल्या रोगामुळे प्रचंड असे नुकसान झालेले आहे तहसील तथा कृषी विभागाला वारंवार सांगून सुद्धा अद्याप पर्यंत साधा पंचनामा किंवा सर्वे करण्यात आलेला नाही कृषी विभाग व तहसील अधिकारी म्हणतात कृषी विद्यापीठाचे अधिकारी तपासणी करण्याकरता येतील तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही आम्हास पंचनामाचे करण्याचे आदेश नाहीत असे सांगण्यात आले,तेव्हा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक ढगे साहेब यांना मोबाईल द्वारे माहिती देण्यात आली तेव्हा कृषी अधीक्षक साहेबांनी मी विद्यापीठाची ताबडतोब संपर्क साधून लवकरात लवकर शेतामध्ये तपासणी करण्याकरिता विद्यापीठाची टीम पाठवितो असे सांगितले.
शेतकरी व शिवसेनेच्या वतीने वारंवार माहिती सांगून निवेदन देऊन अद्याप पर्यंत शासन प्रशासन कडून कुठलेही प्रकारचा पंचनामा झालेला नाही जेव्हा पंचनामास होणार नाही तर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल हा शेतकऱ्याला पडलेला फार मोठा प्रश्न आहे.आज तहसील व कृषी विभागात पिंपरी देशमुख येथील सर्व शेतकरी धडकले प्रचंड असे नुकसान होऊन सुद्धा प्रशासन जागृत होत नसेल तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरिता शिवसेना सज्ज असेल असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांनी दिले.
यावेळी उपस्थित शिवसेना विभाग प्रमुख आकाश माने, विभाग प्रमुख गोपाल शेळके,शाखाप्रमुख गोपाल चव्हाण,अनंता बंड,राम माने,धम्मपाल गवई,शिवाजी महादेव फुंडकर,दशरथ दत्तू रोहनकर,कृष्णराव दादाराव देशमुख,अतुल विश्वासराव देशमुख,शुभम कैलासराव मोरखडे,अशोक बाबुराव मोरखडे,महादेव पांडुरंग काळे,महादेव रामदास बावस्कर,प्रकाश राजाराम वनारे, श्रीकृष्ण महादेव मोळे,दत्ता मनोहर दुतोंडे,गोपाल पुंडलिक साठे,संजय मधुकर वनारे,वैभव सोपान वाघ,गजानन तोताराम वसतकार,शिवम प्रकाश वनारे,विठ्ठल जनार्दन काळे,विश्वनाथ दशरथ काळे,प्रशांत विश्वासराव इंगळे,शुभम वसंता वनारे,अमोल शत्रुघुन काळे,किशोर ज्ञानदेव धोटे,वैभव संजय धोटे,ज्ञानदेव महादेव शिरपुरे,केशव महादेव काळे,विठ्ठल गणपत कवळे,पवन संजय धोटे,सागर ज्ञानदेव धोटे,संजय समाधान धोटे,जनार्दन समाधान कोगदे,समाधान शंकर कोगदे,यशोदा शंकर वरणकार,प्रतीक्षा अशोक मोरखडे,संदीप ज्ञानदेव धोटे,श्रीकृष्ण तुळशीराम देवळे,दीपक भाऊराव देशमुख,सोपान शिवराम वाघ,तुकाराम रामकृष्ण वरणकार,अनंदा सुखदेव कराळे,सचिन तुकाराम शिरपुरे,मनोरमा बाबुराव मोरखडे,प्रल्हाद सखाराम वगारे,सुनंदा प्रल्हाद वगारे,शिवाजी श्रीकृष्ण मोळे,वसंता राजाराम वनारे यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.



Post a Comment