वॉटरप्रूफ मंडपात रास गरबाचे जेसीआई जय अंबे द्वारा आयोजन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : जेसीआई खामगाव जय अंबे ही संस्था रास गरबा उत्सव भव्य स्तरावर आयोजित करण्यासाठी खामगाव शहरासह सम्पूर्ण जिल्हामध्ये प्रसिद्ध असून या वर्षी सुद्धा गरबा प्रेमी नागरिकांना पावसामूळे गरबा खेळताना होणाऱ्या असुविधांचा विचार करून संस्थेतर्फे खामगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य असा वॉटरप्रूफ डोम मंडप उभारण्यात आला आहे. ज्यामूळे मंडपाच्या बाहेर कितीही पाऊस सुरु असला तरी मंडपात कोणत्याही अडचणी शिवाय रास गरबा सुरु राहणार आहे. नवरात्रीच्या पावन पर्वावर सोमवार 22 सप्टेंबर पासून बुधवार 01 ऑक्टोबर पर्यंत स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळा सिविल कोर्टाच्या  बाजूला दररोज संध्याकाळी 07.30 वाजेपासून करण्यात येणार आहे.

 

जाहिरात 

जेसीआई खामगाव जय अंबे द्वारा आयोजित या भव्य रास गरबा उत्सवात आपल्या संपूर्ण परिवारासह म्हणजेच घरातील लहान मुले असो मुलगी असो जेष्ठ नागरिक असो किंवा नवरा बायको अशा सर्वांना सहभागी होऊन उत्सवचा आनंद घेता येणार आहे. रास गरबा सिजन 06 मधे मोठ्या वाटरप्रूफ डोम मंडपात येणाऱ्या प्रत्येकाचे कुंकू अक्षदा लावून स्वागत, आकर्षक भव्य सजावट, सोशल मीडियावर रील बनविण्यासाठी परफेक्ट बॅकग्राऊंड, सुंदर असे फोटो काढण्याकरिता प्रोफेशनल फोटोग्राफर, वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी कॉर्नर, डोळे दीपवणारी रोषणाई, पेटपूजे साठी चविष्ट नाष्टयाची दुकाने, मधुर कर्णप्रिय संगीता सोबतच मंडपात खेळायला येणाऱ्या मुली व महिलासाठी चोख सुरक्षा व्यवस्थापन तसेच चारचाकी व दुचाकी वाहनाकरिता गेट च्या आतमध्ये पार्किगची निशुल्क सुविधा संस्थे च्या वतीने करण्यात आली आहे. 

 खामगाव शहर व परिसरातील नागरिकांनी जेसीआई खामगाव जय अंबे द्वारा आयोजित या रास गरबा सिजन 06 मधे आपल्या परिवारासह सहभाग घ्यावा व या नवरात्री उत्सवात गरबा खेळायचा मनमुराद  आनंद लुटावा असे आव्हान करत अधिक माहितीसाठी संस्थेचे प्रणेते डॉ भगतसिंह राजपूत (9850956495) , अध्यक्ष  ऍड दिनेश वाधवानी (9326094440 ), सचिव डॉ आनंद राठी (8551917444), कोषाध्यक्ष ऋषीकेश डीडवानिया, प्रकल्प प्रमुख कौस्तुभ मोहता (9422926530), सहप्रकल्प प्रमुख डॉ गौरव गोयंनका (9922146664), या संपूर्ण रास गरबा उत्सवाचे व्यवस्थापक योगेश खत्री (9890725000), सह-व्यवस्थापक रोहन जैसवाल, पूर्वाध्यक्ष डॉ शालिनी राजपूत, ऍड रितेश निगम सह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. अशी माहिती जेसी रोहन जैसवाल यांनी एका प्रसिद्धीप्रत्रका द्वारे दिली.

Post a Comment

أحدث أقدم