स्वच्छता पंधरवडा मोहिमेची खामगाव नगरपरिषदेने केली सुरुवात
स्वच्छ खामगांव – सुंदर खामगांव निर्माण करण्यासाठी सर्वांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा - सी.ओ. डॉ प्रशांत शेळके
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे करत न प कर्मचारी महिला बचत गटातील सदस्य यांनी आज स्वच्छता अभियाना मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
स्वच्छता पंढरवाडा अंतर्गत “एक तास एक साथ” श्रमदानातून स्वच्छता अभियान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकमान्य टिळक पुतळा परिसरात राबाविण्यात आले. यावेळी नगरपरिषद सर्व अधिकारी व कर्मचारी, शहरातील विविध सेवाभावी संस्था,पत्रकार बांधव,महिला बचत गट उपस्थित होते. दरम्यान स्वच्छ खामगांव – सुंदर खामगांव निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा असे आव्हान मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी केले.



إرسال تعليق