लॉयन्स सेवा सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम व सेवाकार्याचे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: लॉयन सेवा सप्ताह सेवांजली अंतर्गत लॉयन्स क्लब खामगाव ने दिनांक १ ऑक्टोंबर पासून विविध उपक्रम राबवले त्यामध्ये प्रामुख्याने 1 ऑक्टोंबर रोजी ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला लॉयन्स व लिओ मेंबर यांनी मिळून रक्तदान केले तसेच 2 ऑक्टोंबर रोजी स्वच्छता अभियाना अंतर्गत लायन्स आय हॉस्पिटल येथे साफसफाई करण्यात आली त्यामध्ये बहुसंख्येने लॉयन मेंबरनी उपस्थित राहून हॉस्पिटलच्या आतील व बाहेर सगळ्या प्रकारे साफसफाई करण्यात आली 3 ऑक्टोंबर रोजी लायन्स ज्ञानपीठ खामगाव या शाळेमध्ये पहिली ते तिसरी वर्गातल्या 480 विद्यार्थ्यांची जनरल तपासणी दंत व नेत्र तपासणी करण्यात आली त्यामध्ये गावातील नामवंत डॉक्टर लायन्स पदअधिकाऱ्यांनी सहभाग घेतला 4 ऑक्टोंबर रोजी नॅशनल हायस्कूल खामगाव येथे आठवीतल्या 300 विद्यार्थीसाठी वुमन्स हेल्थ व मिनिस्टर हायजिन अशा सामाजिक विषयावर सेमिनार घेण्यात आला
.
![]() |
| जाहिरात |
या सर्व सेमिनार मध्ये लॉयन लेडीज उपस्थित होत्या तसेच 5 ऑक्टोंबर रोजी स्वर्गीय श्रावण बावस्कर गुरुजी यांच्या स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा वितरण लॉयन आय हॉस्पिटल खामगाव येथे करण्यात आले 5 तारखेलाच डॉक्टर बावस्कर यांच्या हस्ते त्यांच्या मातोश्री स्वर्गीय मनकांदाबाई श्रावण बावस्कर यांच्या स्मृती पित्याचे राष्ट्रीय विद्यालय जिन्नोध्दार करण्यासाठी 51 हजार रुपये रोख देण्यात आले तसेच 6 ऑक्टोबर रोजी हर्ष नर्सिंग स्कूल सुटाला येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम करण्यात आला व सोबतच 6 ऑक्टोंबर रोजी जागतिक सेलिब्रल पाल्सी दिनानिमित्त रोटरी मतिमंद स्कूल येथे लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व पीएसटीने त्या मुलांसोबत वेळ घालवत चॉकलेट खेळायचे साहित्याची वाटप करण्यात आली.अशी माहिती लॉयन्स क्लब चे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैस्वाल व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे दिली आहे.


Post a Comment