"ऑपरेशन नन्हे फरिश्ते"अंतर्गत वर्ध्याची दोन मुले शेगाव आरपीएफ ने केली परिवारास स्वाधीन
सविस्तर वृत्त असे की दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा वर्धा येथील दोन 15 वर्षीय बालक अचानक बेपत्ता झाली त्यामुळे दोघांच्या परिवाराने वर्धा पोलिसात धाव घेतली. CCTV च्या आधाराने दोन्ही मुले आपली सायकल वर्धा रेल्वे स्टेशन ला लावून सेवाग्राम एक्सप्रेस ने मुंबई च्या दिशेने जाताना दिसून आली त्यानंतर वर्धा पोलीस श्री वानखडे यांनी याची माहिती आरपीएफ शेगाव चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना दिली परंतु तोपर्यंत ट्रेन मलकापूर च्या ही पुढे निघून गेली त्यामुळे रंजन तेलंग यांनी आरपीएफ कंट्रोल भुसावळ ला फोटो सोबत माहिती दिली परंतु दोन्ही मुले ट्रेन मध्ये आढळून आली नाही त्यानंतर रंजन तेलंग यांनी आज सकाळी शेगाव येथील CCTV चेक करत असताना आरक्षक धरम पडोळकर यांनी तेलंग यांना 02 मुले संशयित रित्या प्लॅटफॉर्म वर असल्याचे सांगितले .रंजन तेलंग यांनी लगेच जाऊन बघितले असता तीच दोन मुले दिसून आली कारण विचारले असता दोघांनी ही पालकांनी जास्त टक्के मिळवून पास होण्यासाठी दबाव टाकल्याचे माहीत पडले त्यानंतर याची माहिती निरीक्षक श्री शांताराम हरणे
![]() |
| जाहिरात |
तसेच दोघांच्या परिवारास तसेच वर्धा पोलिसांना दिली .मुले भेटली हे माहीत पडताच दोन्ही मुलांच्या आई फोनवर च रडायला लागल्या आणि त्यांनी सरळ शेगाव गाठले त्यानंतर ASI प्रवीण भरणे व रंजन तेलंग यांनी बालकल्याण समिती बुलडाणा च्या समक्ष दोन्ही मुलांना कायदेशीर रित्या दोन्ही मुलांना समुपदेशन करून परिवाराच्या स्वाधीन केली.


Post a Comment