शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे मुलींच्या वसतीगृहात खामगांव शहर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने कायदेविषयक मार्गदर्शन

आपल्या देशात मुलींना कायद्याविषयक ज्ञान असणे हे त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कायद्याची माहिती असल्यामुळे मुलींना त्यांचे हक्क आणि अधिकार कळतात, ज्यामुळे त्या आत्मविश्वासाने आणि सक्षमपणे जीवन जगू शकतात. हाच उद्देश लक्षात ठेऊन गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव  येथील मातोश्री मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Advt.

सदर कार्यमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे हे होते तर वक्त्या म्हणून PSI सारिका नारखेडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती इंगळे आणि कायदेतज्ज्ञ ऍडव्होकेट आशा भागवत उपस्थित होत्या. PSI सारिका नारखेडे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क (संविधानाचे कलम १२ ते ३५) म्हणजे महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे जसे की घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक छळापासून बालकांचे संरक्षण कायदा याची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थिनीना कायद्याचे ज्ञान  अत्यंत आवश्यक आहे. आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात अनेकदा लोक अनवधानाने गुन्हेगारी कृत्यात अडकतात, कारण त्यांना कायद्याची मूलभूत माहिती नसते. अशा वेळी योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळणे हे अत्यंत गरजेचे ठरते हे सांगितले.  

जाहिरात

हेड कॉन्स्टेबल ज्योती इंगळे यांनी पोलीस विभाग केवळ गुन्हे उघड करण्यासाठी नसून, समाजात शिस्त, सुरक्षितता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठीही कार्य करतो. नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबर जबाबदाऱ्यांचेही पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियम, महिलांच्या सुरक्षेचे कायदे, सायबर गुन्हे आणि घरगुती हिंसाचारावरील कायदे याबाबत माहिती घेणे ही काळाची गरज आहे हे सांगितले.

ऍडव्होकेट आशा भागवत यांनी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संघटनेने कायद्याविषयक कार्यशाळा आयोजित करून तरुण पिढीला कायद्याची ओळख करून दिली पाहिजे. जागरूक नागरिक समाजाला सक्षम बनवतात, आणि सक्षम समाजच सुशासनाची पायाभरणी करतात हे सांगितले. मुलींना हक्क आणि अधिकारांची जाणीव, संरक्षण आणि सुरक्षितता, आत्मविश्वास आणि स्वावलंबन, समानता व न्याय मिळवण्यास मदत करतात.


संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी अध्यक्षीय समारोप करताना शालेय व महाविद्यालयीन स्तरावर कायदेविषयक ज्ञान मुलींना खऱ्या अर्थाने सक्षम बनवते आणि समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सहभाग वाढवते. प्रत्येक मुलीने आपल्या हक्कांसाठी सजग राहणे आणि कायद्याचा आधार घेणे महत्त्वाचे आहे हे सांगितले. 

 या कार्यक्रमासाठी प्रा समीर कुलकर्णी, प्रा रेशमी भारसाकळे व प्रा ललिता सुलतान उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री निमकर्डे व आभार प्रदर्शन मधुमिता दिघे यांनी केले असे प्रसिध्दीप्रमुख प्रा राजेश मंत्री यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post