राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने प्रवीण जमधाडे सन्मानित 


 जनोपचार न्यूज नेटवर्क:-  शिवप्रतिष्ठान पुणे तर्फे सन २०२५ राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळा 2025 आळंदी देवाची पुणे येथे आज 26 ऑक्टोबर 2025 रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या समारंभात खामगाव येथील अ खी नॅशनल हायस्कूल चे शिक्षक श्री प्रवीण जमधाडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक  रत्न पुरस्कार 2025 चा प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक गिर्यारोहक  कु. अनवी घाटगे  तसेच सिनेतारका प्रतीक्षा जाधव व मदन रेनगडे पाटील संचालक अध्यक्ष शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post