लाडक्या बहिणींना पाणी मिळेना....!
लाडक्या बहिणी आल्या घरी... मात्र पाणी झाले गायब !!
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: - दीपावली नंतर भाऊबीजेला बहिणी भावांकडे आल्या मात्र नळाला पाणी नसल्याने आता बहिणींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गेल्या दोन दिवसापासून गेरू माटरगाव येथील येणारे मेन पाईपलाईन नदी पात्रात लिकेज झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन चार दिवसात नळाला पाणी येणे शक्य नसल्याचे शक्य नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. साहित्याची आवश्यकता असून साहित्य आल्यानंतर पाईपलाईन दुरुस्त करता येईल असेही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते मात्र तातडीची उपाययोजना अद्याप करण्यात आले नसल्याने बहिणींना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जोपर्यंत साहित्य पुरविल्या जात नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणे दुराफास्त झाल्याचेही सांगण्यात येत असून घाटपुरी टाकी व वामन नगर टाकी वरील पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती करिता अंदाजे तीन ते चार दिवसाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी घरात असलेले पाणी सांभाळून वापरावे. असा मोफत चा सल्ला पालिकेकडून दिल्या जात आहे.
6:52

Post a Comment