ब्रह्माकुमारीज केंद्रावर नवरात्री उत्सव
खामगाव जनोपचार नेटवर्क- स्थानीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येथे नवरात्रीनिमित्तविधिवत 51 कलशाची स्थापना करून पूर्ण नऊ दिवस दैवी गुणांचा अभ्यास करून योगसाधना करण्यात आली. तसेच 2 ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या अनुषंगाने नवरात्रीचा उत्सवाचा समारोप करण्यात आला. या दिनी सकाळी सहा वाजता पासून ध्यान, तदनंतर ईश्वरीय महावक्याचे श्रवण करण्यात आले. कन्या पूजनही करण्यात आले. यावेळी भवानी देवीच्या भूमिकेत कु.कशिश राठी, देवी गायत्रीच्या भूमिकेत वृंदा गोरे, देवी संतोषीच्या भूमिकेत वेदांती गोरे, देवी वैष्णवीच्या भूमिकेत श्रेया इंगळे, आंबा देवीच्या भूमिकेत देवांशी पर्वते, देवी दुर्गाच्या भूमिकेत वैभवी जाधव, देवी सरस्वतीच्या भूमिकेत परी वाघमारे ह्या कन्या होत्या. यावेळी सेवाकेंद्र संचालिका बी के शकुंतला दीदी, बी के सुषमा दीदी, बी. के. दिव्या दीदी यांचाही नवरात्रीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. सौ छाया टाके, संगीता चांडक, शीला देशमुख या महिलांनी चैतन्य देवींची ओटी भरली, सौ आरती बुलानी यांनी सर्व कन्यांना भेटवस्तू प्रदान केल्या.
चैतन्य नवदुर्गा देवीचे आध्यात्मिक रहस्य शकुंतलादीदी यांनी सांगितले. तसेच स्वतः मधल्या वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणजेच रावण असून आपल्यातल्या पाच विकारांना त्यागून गुणांची, शक्तींची धारणा करण्याचा संकल्प सर्वांकडून करून घेण्यात आला. कुमारी देविका कापडे हिने नृत्य प्रस्तुत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जानकी चांडक यांनी केले शेवटी देवीची आरती करून सर्वांना प्रसादाचे वितरण करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती.क

Post a Comment