खामगावात रंगला खेळ पैठणीचा...
दीपा पुरवार यांनी जिंकली पैठणी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल फाउंडेशनने ३० सप्टेंबर रोजी खामगाव येथील डीपी रोड वर्धन लेआउट गार्डन येथे होम मिनिस्टर खेल पैठणी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा दीपमाला कांबळे, शिवानी ताई कुलकर्णी,रत्नाताई डिक्कर,नगरसेविका भाग्यश्रीताई मानकर, जान्हवी ताई कुलकर्णी, श्रद्धाताई धोरण,ज्योती बावस्कर, सीमा पांडव, माधुरीताई गवई, नेमाने ताई यांनी केले होते. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पैठणी साडीच्या स्वरूपात पहिले पारितोषिक दीपा पुरवार यांना देण्यात आले. दुसरे पारितोषिक कल्पना लाहुडकर यांना चांदीचे नाणे देण्यात आले. तिसरे पारितोषिक सुनीता मोरखडे यांना ज्यूसर देण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल फाउंडेशनच्या महिला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment