नवरात्रीच्या नऊ रंगात सजले आदर्श ज्ञानपीठ
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- शहरातील घाटपुरी नाका परिसरात असलेल्या आणि गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबतीत नावलौकिक प्राप्त असलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज खामगाव मध्ये दिनांक 22/9/2025 पासून सुरू झालेला नवरात्रीच्या उत्सवात आदर्श ज्ञानपीठ व विद्यार्थी रंगून गेले आहेत.
उत्सवाचे स्वरूप असे की प्ले ग्रुप पासून इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नवदुर्गेच्या रूपाचे महत्त्व वर्गनिहाय ऍक्टिव्हिटी द्वारे पटवून दिले असून त्यांच्या स्वकलाकृतीतून त्यांनी ते स्पष्ट देखील केले आहे. काळाची गरज ओळखून मुलांमध्ये इंग्रजी शिक्षणासोबतच आपल्या संस्कारांची जपवणूक सुद्धा रुजवली गेली पाहिजे या हेतूने मुलांना स्त्री सन्मान समजावा तसेच मुलींना स्व शक्तीचीं जाणीव व्हावी यासाठी शाळेमध्ये छोटासा मातेचा जागर सुद्धा विद्यार्थ्यांद्वारे घेतल्या गेला. नित्यनियमाने नवरात्री पर्वाचे औचित्य साधून देवीच्या महिषासूर मर्दीनी रुपाला समर्पित लोकप्रिय स्रोत 'ऐगिरी नंदिनी' विद्यार्थ्यांनी पठण केले. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त कलागुणांना या नवरात्री ऍक्टिव्हिटिंद्वारे वाव देऊन विद्यार्थ्यांच्या अंगी नववर्षासाठी नवचैतन्य निर्माण होत असल्याचे दिसून येत होते.
विद्यार्थी अनुकरणाचे द्योतक मानले जातात त्यामुळे आदर्श शाळेतील शिक्षिका स्वकृतीतून तसेच सकारात्मक वातावरण तयार करत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम विचारधारा रुजवत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतांना दिसत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पळसकर, पर्यवेक्षिका प्रियंका राजपूत, ज्येष्ठ शिक्षिका ममता महाजन, ज्योती वैराळे,माधुरी उगले, सारिका सरदेशमुख, अलका वेरुळकर,प्रिया देशमुख, अक्षया इरतकर, अर्चना लाहुडकर,काजल होनवलकर, नर्मदा धांडे, अलका राऊत, मानसी लांडे, वर्षा मोरे,श्वेता आवारे, पूनम कासलीवाल,संदीप ढोले सर, प्रियंका नेटके, शीखा गावंडे, सपना हजारे, संगीता पिवळटकर, वंदना गावंडे,सुवर्णा वडोदे, प्रतिभा गावंडे,चंदा गावंडे, आदींनी प्रयत्न केले.





Post a Comment