पत्रकार संजय वर्मा यांच्या घरात घुसून राडा:  देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल

पत्रकार संजय ओमप्रकाश वर्मा वय 53 वर्षे व्यवसाय – पत्रकार यांच्या घरात घुसून त्यांच्या बोटाला चावा घेत मारहाण करून शिव मारण्याची धमकी देणाऱ्या सचिन जगतराव देशमुख वय अंदाजे 37 वर्षे रा. केलानगर खामगाव याच्या विरुद्ध खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार  पत्रकार सभी वर्मा हे घरी असतांना आरोपी सचिन देशमुख याने घरात घुसुन वर्मा यांच्या आई वडीलांना अश्लील शीवीगाळ करुन संजय वर्मा यांच्या उजव्या हाताचे बोटाला चावा घेउन दुखापत केली. तसेच मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अशा फिचे तोंडी रिपोर्टवरुन सदरचा अप दाखल करुन सदर गुन्हाचा तपास मा. पोनि सा यांचे आदेशाने पोहेकाँ मनोहर गारे बन 515 पोस्टे खामगाव शहर यांचेकडे देण्यात आला. या घटनेचा राज्य मराठी पत्रकार परिषदेसह वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी निषेध नोंदविला.




Post a Comment

أحدث أقدم