प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात दीपोत्सव साजरा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानीय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रायगड कॉलनी या ठिकाणी दिनांक 21 ऑक्टोंबर मंगळवार रोजी सकाळी दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला
याप्रसंगी सेवा केंद्र संचालिका आदरणीय शकुंतला दीदी यांनी दिवाळीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या निराकार शिव परमात्मा धरतीवर अवतरीत होऊन सतयुगाची स्थापना करीत आहेत आपण सर्व शरीराला चालवणारी एक चेतनशक्ती आत्मा आहोत स्वतःला आत्मा समजून शरीराच्या द्वारे कर्म करणे , आत्मज्योत जागृत करणे म्हणजेच खरी दिवाळी साजरी करणे.निराकार शिव परमात्मा जो सर्व शक्तींचा स्त्रोत आहे आपली मन आणि बुद्धी ची तार परमात्म्याची जोडणे म्हणजेच राजयोग आहे
राजयोगाच्या नित्य अभ्यासाने दैवी गुणांची धारणा जीवनामध्ये होते. आपल्यातील मनोविकारांवर विजय मिळवता येते. भविष्यात स्वर्णिमयुग धरतीवर येणार आहे हा संदेश द्यायसाठी हा देखावा आज ब्रह्माकुमारीच्या वतीने सादर करण्यात आला आहे स्वर्णीय युगाच्या झाकीमध्ये राधेच्या भूमिकेत परी वाघमारे, कृष्णाच्या भूमिकेत योगेश कुमठे लक्ष्मीच्या भूमिकेत श्रुतिका निकम नारायणाच्या भूमिकेत ईश्वरी राखोंडे हे होते या पावन पर्वावर श्री लक्ष्मी चे पूजन महा आरती करण्यात आली याप्रसंगी एडवोकेट माननीय श्री अमोल जी अंधारे यांच्या शुभहस्ते लक्ष्मीपूजन तसेच आरती करण्यात आली. उपस्थित सर्वांना दिवाळीचे शुभेच्छा प्रदान करणारे कार्ड तसेच प्रसाद वाटण्यात आला. मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारीस परिवारातील सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा अग्रवाल व आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी सुषमा दिदी यांनी केले.

إرسال تعليق