भाजपाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला


जनोपचार न्यूज नेटवर्क नांदुरा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते. व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती,यांचेसह  प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डाॅ गणेश दातीर,बलदेवराव चोपडे, मोहन शर्मा, राजेश पाटील, भाऊराव पाटील, सौ. कल्पना मसने, अनिता देशपांडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष  सारिका डागा,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश संचेती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्याचे कॅबिनेट मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी “भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची विविध शासकीय समित्यांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनाच स्थान दिले जाईल. पक्ष मजबूत करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता काबीज करा.”असे आवाहन केले.

 घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषद सदस्य 24, पंचायत समिती सदस्य 48, नगरसेवक 141 आणि ग्रामपंचायती 200 निवडणुका होणार आहेत. "सक्षम उमेदवार द्या आणि निवडून आणा,"असे यावेळी सांगण्यात आले.“बुथ मजबूत असणे ही विजयाची गुरुकिल्ली आहे. आपला गाव, सर्कल स्वतः सांभाळा. सत्ता आपली आहे — हा आपला प्लस पॉईंट आहे. दिवाळीनंतर नगरपरिषद निवडणुकीबरोबरच ग्रामीण भागातील जि.प. व पं.स. निवडणुकीच्या बैठका सुरू ठेवा. तीन उमेदवार तयार ठेवा, सर्वेक्षण करा आणि ठोस नाव निश्चित करा. जि.प. मध्ये 100% निकाल आपलाच हवा.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदचंद्र गायकी व महेश पांडे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस ब्रह्मानंद चौधरी यांनी केले.या कार्यशाळेत जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم