सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूल्यांचा आदर्श जोपासणे आम्हा नवीन पिढीला आवश्यक -श्रेणिक लोढा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- स्वातंत्र्यानंतर भारतात 562 देशी राजे /संस्थान होती.या सर्व संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून एकसंध राष्ट्र निर्माण करण्याचे अमूल्य कार्य सरदार पटेल यांनी केले. त्यांच्या दृढ निश्चय, प्रखर देशप्रेम,नेतृत्व क्षमता,सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकता
या गुणांचा आदर्श आम्हा नवीन पिढीने जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस दल बुलढाणा व लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित "रन फॉर युनिटी" व "वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमांमध्ये केले.
या कार्यक्रमांमध्ये श्रणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, लॉयन्स क्लब अध्यक्ष एमजे एफ लॉ. आकाश अग्रवाल, ठाणेदार रामकृष्ण पवार पो स्टे खामगाव शहर, ठाणेदार सुरेंद्र अहिरकर पोस्टे शिवाजीनगर , ठाणेदार किशोर तावडे पोस्टे खामगाव ग्रामीण यांचे सह लॉयंस क्लब संस्कृतीचे सर्व पदाधिकारी डीसीबी बँक च्या मॅनेजर नीता वर्मा प्रमुख उपस्थितीमध्ये होते.
वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमांमध्ये जी एस महाविद्यालयाचे प्राचार्य तळवणकर सर, एनसीसी युनिट, एन एस यु आय युनिट, इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी, साई अकॅडमीचे संचालक बेलसरे सर व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, लायन्स ज्ञानपीठ चे संचालक मंडळ प्राचार्य शिक्षक वृंद, एस एस डी वी चे संचालक, शिक्षक वृंद, मिशन ओटूचे डॉक्टर कालिदास थानवी व त्यांचे सर्व मेंबर्स, नव संकल्प फाउंडेशन, तरुणाई फाउंडेशन, गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, नगरपालिका सीओ प्रशांत शेळके व सर्व कर्मचारी, सृष्टी मंगलम ग्रुप, रोटरी क्लब मेंबर्स, जेसीआय खामगाव मेंबर्स, जेसीआय जय अंबे ग्रुप खामगाव मेंबर्स, लायन्स क्लब खामगाव मेंबर्स, नाना नानी पार्क मधील हास्य क्लब, योगा ग्रुप, राधे राधे ग्रुप, पोलीस दलातील सर्व कर्मचारी व अधिकारी, अमोल अंधारे व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, सर्वसामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला संघटना, युवक संघटना तेजस्विनी ग्रुप, खामगाव प्रेस क्लब, व प्रेस क्लब खामगाव यांचे सर्व पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक मीडिया चे सर्व पदाधिकारी, गावातील बहुतांश प्रतिष्ठित व्यक्ती व महिला विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
वॉक फॉर युनिटी मध्ये सहभागींना उस्फूर्तपणे पाणी वाटपाचे कार्य संदीप राजपूत मित्र मंडळ जलंब नाका व कीर्ती भाई खिलोशिया यांच्याकडून जीएस कॉलेज गेट समोर करण्यात आले, इतर ठिकाणी सुद्धा पाणी वाटपाचे कार्य काही संस्थांनी व वैयक्तिकरित्या केल्याचे आढळून आले. मार्गामध्ये सुद्धा सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन कन्हैयालाल पारीख यांचे निवासस्थानासमोर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,
या कार्यक्रमासाठी डीसीबी बँक कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच लॉयन्स क्लब संस्कृतीचे मेंबर्स यांनी मोलाचे सहकार्य दिले, प्रकल्प प्रमुख लॉयन संजय उमरकर एमजेएफ लॉ. सुरज एम अग्रवाल, एमजेएफ लॉ. अजय एम अग्रवाल, आणि सचिव लॉ.डॉ. निशांत मुखिया, कोषाध्यक्ष लॉ. आशिष मोदी व ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख लायन्स क्लब संस्कृती एम जे एफ लॉयन राजकुमार गोयनका यांनी दिली.


Post a Comment